ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत, अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार सचिन अहिर यांना महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत, अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार सचिन अहिर यांना महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली. सचिन अहिर हे ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याचं सांगितलं जातं. आता सचिन अहिर यांची आज (१ जुलै) रोजी उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून जगन्नाथ अभ्यंकर यांनीही अर्ज भरला होता, परंतु नंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली.
सचिन अहिर यांच्या बिनविरोध निवडीनंतर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आणि अहिर यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील भाष्य केले. ते म्हणाले, “खऱ्या अर्थाने शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि उपसभापतीपदी शिवसैनिक बसल्याचा आनंद आहे,” याआधी नीलम गोऱ्हे यांनी या पदाची गरिमा राखली होती आणि पूर्ण न्याय केला होता, असंही त्यांनी नमूद केलं. यानंतर त्यांनी कविता आणि शायरीच्या माध्यमातूनही सचिन अहिर यांचे अभिनंदन केले.
