एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच…सुदैवाने मोठा अपघात टळला
एकनाथ शिंदेंचा मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे एका लग्नासाठी जात असताना ही घटना घडली आहे.
प्राथिमिक माहितीनुसार, मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये वादळांसह सोसाट्याचा वारा सुटला होता यामुळे उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर तब्बल दहा ते वीस मिनीटे वादळात घोगावत होतं. पायलटनं योग्यरित्या एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर जुहू एयरपोर्टवर इमर्जेंसि लॅंड केलं. एकनाथ शिंदे हे, महालक्ष्मीहुन मुरबाडला जात होते. एकनाथ शिंदे यांच्यसोबत असलेले इतरही सुखरुप असल्याचं समोर आलं आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बालसिंह राजपूत, जनसंपर्क विभागाचे विशेष कार्य अधिकारी विनायक पात्रुडकर आणि सुरक्षा रक्षक तसेच विमान कंपनीचे प्रतिनिधी होते.
