DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना… अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच

DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना… अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच

| Updated on: Jun 23, 2026 | 6:02 PM

ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मतदारसंघाचा विकास आणि विकासनिधी या कारणामुळेच आम्ही पक्षांतर करत आहोत, असे काहींनी सांगितल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, आता खासदारांनी प्रक्षप्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी पेटारा उघडला आहे.

ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मतदारसंघाचा विकास आणि विकासनिधी या कारणामुळेच आम्ही पक्षांतर करत आहोत, असे काहींनी सांगितल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, आता खासदारांनी प्रक्षप्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी पेटारा उघडला आहे. जे खासदार पक्षात आलेले आहेत, त्यांना भरघोस विकासनिधी दिला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

यावेळी पत्रकरांच्या प्रश्नांना उत्तर देत शिंदे यांनी सांगितले की, ओमराजेंच्या कोणत्याही अडचणीत पक्ष त्यांच्या सोबत राहिली… त्यांच्या कौटुंबिक वादातही पक्ष त्यांच्यासोबत राहिल… 2029 मध्ये हे सर्व खासदार शिवसेनेत्या चिन्हावर महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून येतील.

सहा खासदार आमच्या परिवारात आले आहेत. अगोदर आमच्याकडे सात खासदार होते. आता सहा खासदार आले आहेत. आमची टीम आता मोठी झाली आहे. राज्यसभेचे दोन खासदार आहेत. आता शिवसेना अधिक बळकट होईल. आलेल्या खासदारांच्या विभागात वेगाने विकास होईल, असा विश्वानस एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Published on: Jun 23, 2026 6:02 PM
Follow Us