Eknath Shinde | तब्येत बिघडली… पण काम थांबलं नाही! हॉस्पिटलमधूनच अ‍ॅक्शन मोडमध्ये शिंदे; महाड-रायगड पूरस्थितीवर दिले तातडीचे आदेश

Eknath Shinde | तब्येत बिघडली… पण काम थांबलं नाही! हॉस्पिटलमधूनच अ‍ॅक्शन मोडमध्ये शिंदे; महाड-रायगड पूरस्थितीवर दिले तातडीचे आदेश

| Updated on: Jul 06, 2026 | 11:36 AM

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातूनच पूरग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असले, तरी राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर त्यांनी सातत्याने लक्ष ठेवले आहे.

पूरस्थितीचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री भरत गोगावले, योगेश कदम आणि उदय सामंत यांना महाड आणि रायगड जिल्ह्यातील परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

याशिवाय, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून नागरिकांना मदत करावी, बचाव आणि मदतकार्याला गती द्यावी, असे आदेशही शिंदे यांनी दिले. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांकडून येणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

दरम्यान, प्रकृती ठीक नसतानाही रुग्णालयातूनच राज्यातील पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवत प्रशासनाला आवश्यक निर्देश देत असल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या कामावर सरकारचे लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Published on: Jul 06, 2026 11:36 AM
Follow Us