Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार

Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार

| Updated on: Nov 05, 2026 | 6:58 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर भारतीय संविधानाला डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. लोकशाही बचाव रॅलीत बोलताना फडणवीस म्हणाले की, लढाई संसदेतच होईल, मात्र गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्यासही आम्ही कमी पडणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर भारतीय संविधानाला डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव या महारॅलीदरम्यान ते बोलत होते. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भाषणाची सुरुवात केली.

यावेळी त्यांनी राहुल गांधींनी “आता लढाई संसदेत नाही, रस्त्यावर होईल” असे म्हटले होते, यावर जोरदार पलटवार केला. फडणवीस म्हणाले, “जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे, तोपर्यंत लढाई संसदेतच होईल. पण, जर रस्त्यावर लढण्याची वेळ आली, तर त्यातही आम्ही कमी नाही हे दाखवण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत.” लोकशाहीला ज्या प्रकारे लक्ष्य केले जात आहे, आणि संविधानाला डावलण्याचा प्रयत्न राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे, त्या विरोधात ही लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या रॅलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांसह अनेक नेते उपस्थित होते.

Published on: Nov 05, 2026 6:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us