Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
मुंबईतील मंत्रालयासमोर आज शेतकऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन सुरू केले. विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चार आंदोलक झाडावर चढले होते. अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत तिघांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आले आहे. मात्र, एक आंदोलक अद्याप झाडावर असून त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
झाडावर आंदोलन करणाऱ्यांमध्ये विठ्ठल खेडेकर (बुलढाणा), श्रीराम चेलवाड (लातूर) आणि आणखी दोन आंदोलकांचा समावेश असल्याची माहिती आहे.
दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर लवकरच घटनास्थळी पोहोचणार असून, झाडावर असलेल्या आंदोलकाची समजूत काढून आंदोलन शांततेत मागे घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सध्या अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी तैनात असून, उर्वरित आंदोलकाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.