MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल

MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल

| Updated on: Aug 26, 2026 | 1:50 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारा घटनाक्रम समोर आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणामागे एक लव्ह स्टोरी कारणीभूत आहे. एका प्रियकराने MPSC मधील काही कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून पेपर फोडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, फुटलेला हा गोपनीय पेपर […]

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारा घटनाक्रम समोर आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणामागे एक लव्ह स्टोरी कारणीभूत आहे. एका प्रियकराने MPSC मधील काही कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून पेपर फोडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, फुटलेला हा गोपनीय पेपर केवळ एकाच व्यक्तीला मिळाला असल्याची चर्चा आहे. यामुळे, लाखो विद्यार्थ्यांना या पेपरफुटीचा फटका बसला असून, परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या लव्ह स्टोरीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला असून, संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Published on: Aug 26, 2026 1:48 PM
Follow Us