देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका

देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका

| Updated on: Jul 07, 2026 | 4:17 PM

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी रस्ते बंद झाले असून प्रशासन सतर्क मोडवर काम करत आहे. अशातच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर उतरले होते. मात्र पाहणीदरम्यान त्यांची गाडी चिखलात अडकल्याची घटना समोर आली आहे.

एका देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचला होता. याच दरम्यान गिरीश महाजन यांच्या ताफ्यातील गाडी चिखलात अडकली. काही वेळ वाहन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर गाडी बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून आम्ही सगळीकडे पाहणी करत आहोत. आम्ही फिल्डवर उतरून काम करतो. यानंतर त्यांनी सांगितले की माझी गाडी अडकली नाही तर पोलिसांची गाडी अडकली, मी माझ्या गाडीतून उतरलो अन् माझी कला वापरून काडी काही मिनिटांतच काढली” त्यांच्या या वक्तव्याचीही आता चर्चा रंगली आहे. अनेक भागांत अजूनही जोरदार पाऊस सुरू असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jul 07, 2026 4:00 PM
Follow Us