Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर

Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर

| Updated on: Nov 09, 2026 | 12:33 PM

कोल्हापुरातील दसरा चौकात गोकुळ दूध संघातील चार शासन नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या विरोधात तीव्र संघर्ष मोर्चा काढण्यात आला. दूध उत्पादक शेतकरी आणि समविचारी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात काळे झेंडे दाखवत संताप व्यक्त केला. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे शहरात वाहतूक विस्कळीत झाली.

गोकुळ दूध संघातील चार स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्याप्रकरणी कोल्हापुरात तीव्र जनक्षोभ उसळला आहे. दसरा चौकात दूध उत्पादक शेतकरी आणि समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात एक विशाल संघर्ष मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते सतेज पाटील करत आहेत.

या आंदोलनात हजारोंच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले असून, त्यांनी काळे झेंडे दाखवत सरकारचा निषेध केला. महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय रडीचा डाव असल्याची टीका आंदोलकांनी केली. जिल्ह्याच्या विविध भागातून तसेच जिल्ह्याबाहेरूनही कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. यामुळे कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा परिसर आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

आंदोलकांनी म्हशी आणि पारंपरिक साहित्य घेऊन सरकारविरोधात रोष व्यक्त केला. न्यायालयीन पातळीवरही या प्रकरणी सुनावण्या सुरू असतानाच, रस्त्यावरचा हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला अधिकृत सुरुवात होणार आहे.

 

Published on: Nov 09, 2026 12:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us