अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त

अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त

| Updated on: Aug 15, 2026 | 7:36 PM

अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नी सुनीतामध्ये पुन्हा एकदा जाहीरपणे वाद टोकाला पोहोचलाय. निमित्त आहे कोमल राणी स्वर्णकार नावाची एक नवोदित अभिनेत्री. मागच्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्रित दिसल्यामुळे त्यांच्याबद्दल विविध अफवा सुरू आहेत. त्या अफवांवरुनच गोविंदा त्याच्या मुलीच्या वयाइतक्या तरुणीसोबत फिरतो असं म्हणत गोविंदाची पत्नी सुनीतानं विधान केलं. त्यावर गोविंदानेही प्रतिक्रिया देत […]

अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नी सुनीतामध्ये पुन्हा एकदा जाहीरपणे वाद टोकाला पोहोचलाय. निमित्त आहे कोमल राणी स्वर्णकार नावाची एक नवोदित अभिनेत्री. मागच्या काही दिवसांपासून गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्रित दिसल्यामुळे त्यांच्याबद्दल विविध अफवा सुरू आहेत. त्या अफवांवरुनच गोविंदा त्याच्या मुलीच्या वयाइतक्या तरुणीसोबत फिरतो असं म्हणत गोविंदाची पत्नी सुनीतानं विधान केलं. त्यावर गोविंदानेही प्रतिक्रिया देत पत्नी सुनीताच्या भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

मागच्या अनेक काळापासून गोविंदा सिनेमात झळकलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार आगामी रूपा नावाच्या सिनेमात गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्र दिसणार आहेत. काही चर्चांनुसार गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी कथितपणे काही काळापासून जवळ आहेत. मात्र दोघांमध्ये कुणीही त्यांच्या नात्याबद्दल काही भाष्य केलेलं नाही. दुसरीकडे गोविंदाची पत्नी सुनीता ही तिच्या बेधडक विधानांबद्दल ओळखली जात असल्यामुळे या कथित चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

Published on: Aug 15, 2026 7:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us