Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे…जरांगेंचा काळ…गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं असतानाच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही या वादात उडी घेतली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधत सदावर्ते यांनी एक गाणं केलं आहे.

कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी आपल्या खास शैलीत हे गाणं सादर केलं आहे. “ढोपराला आग लागली, पळा… पळा, अरे मनोज जरांगेचा काळ हो गेला…” अशा शब्दांचा वापर या गाण्यात करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सदावर्ते यांनी या गाण्यातून उपरोधिक भाष्य केल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्याबाबतही या गाण्यातून भाष्य करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, सदावर्ते यांच्या या अनोख्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून, कुणबी प्रमाणपत्राच्या वादात आता त्यांचीही एन्ट्री झाल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. सदावर्ते यांनी नेमकं काय म्हटलं आणि या गाण्यातून त्यांनी जरांगे, शिंदे आणि सामंत यांच्यावर कोणत्या शब्दांत निशाणा साधला, हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ नक्की पाहा.