Sangli | सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल

| Updated on: Mar 20, 2026 | 4:42 PM

सांगली जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासोबतच इतर फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सलगर गावातील एका शेतकऱ्याच्या चार एकर द्राक्षबागेचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. पुढील दोन दिवसांत काढणी होणार असतानाच संपूर्ण बाग उध्वस्त झाली.

सांगली जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासोबतच इतर फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सलगर गावातील एका शेतकऱ्याच्या चार एकर द्राक्षबागेचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. पुढील दोन दिवसांत काढणी होणार असतानाच संपूर्ण बाग उध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, बागेची काळजी कुटुंबाप्रमाणे घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेला उत्पन्नाचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत शासनाने तातडीने मदत करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Published on: Mar 20, 2026 04:42 PM
Follow Us