Hardeep Singh Puri | देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय; नेमकी माहिती समोर!
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात गॅस पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की देशात घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे आणि नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात गॅस पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की देशात घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे आणि नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. लोकसभेत भाषणादरम्यान बोलताना हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर तणावाची परिस्थिती असली तरी भारताने ऊर्जा पुरवठ्याबाबत आवश्यक तयारी केली आहे. घरगुती ग्राहकांसाठी एलपीजी गॅसची कमतरता नाही आणि देशभरात नियमितपणे गॅसचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी सांगितले की, घरगुती वापरासाठी गॅसचा पुरवठा शंभर टक्के सुरू ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर उद्योग क्षेत्रासाठी काही प्रमाणात मर्यादित पुरवठा केला जाऊ शकतो. सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि गरज पडल्यास तातडीचे निर्णय घेतले जातील. दरम्यान, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. तरीही भारतात ऊर्जा पुरवठा सुरक्षित असल्याचा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.
