Imtiaz Jaleel | सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद…..बुलडोझर कारवाईनंतर इम्तियाज जलीलांचा प्रशासनावर हल्लाबोल

| Updated on: May 13, 2026 | 12:38 PM

नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणाशी संबंधित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरात आज मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या कथित अनधिकृत घरावर महानगरपालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे.

इम्तियाज जलील यांनी मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. “या देशात आणि राज्यात जे सुरू आहे, त्याचा आम्ही सुरुवातीपासून निषेध करत आहोत. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले म्हणजे तो दोषी ठरत नाही. काही संघटना, राजकीय नेते आणि माध्यमे मिळून व्यक्तीला दोषी ठरवत आहेत, हे दुर्दैवी आहे,” असे जलील म्हणाले.
तसेच, “महापालिकेने 24 तासांच्या आत कारवाई केली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कोणतेही घर पाडण्यापूर्वी 15 दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे. मात्र सुनावणी होऊन 24 तासही उलटले नव्हते आणि पहाटेच पोलिस बंदोबस्तात घर पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. इतकी घाई का करण्यात आली?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांवर अन्याय झाल्याचा आरोप करत जलील यांनी “आम्ही लोकवर्गणीतून त्यांचे घर पुन्हा उभे करू,” अशी घोषणाही केली. या प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Published on: May 13, 2026 12:38 PM
Follow Us