Hardeep Singh Puri | तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी; सरकारने सगळं सांगितलं!

Hardeep Singh Puri | तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी; सरकारने सगळं सांगितलं!

| Updated on: Mar 12, 2026 | 6:26 PM

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. लोकसभेत भाषणादरम्यान बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, देशातील तेल आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने EMSA प्रणाली लागू केली आहे.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. लोकसभेत भाषणादरम्यान बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, देशातील तेल आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने EMSA प्रणाली लागू केली आहे. या माध्यमातून देशातील इंधन साठा, पुरवठा आणि वितरण यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, भारत हा जगातील मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम भारतावर होऊ नये यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. देशात पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय पेट्रोलियम मंत्रालयाने २४ तास कार्यरत असलेले नियंत्रण कक्षही सुरू केले आहे. या माध्यमातून देशभरातील इंधन साठा आणि पुरवठ्याची परिस्थिती सातत्याने तपासली जात आहे. सरकारचे उद्दिष्ट नागरिकांना परवडणाऱ्या दरात आणि नियमितपणे इंधन उपलब्ध करून देणे हे असल्याचेही पुरी यांनी सांगितले. दरम्यान, मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असली तरी भारतातील इंधन पुरवठा सुरक्षित असल्याचा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.

Published on: Mar 12, 2026 06:26 PM
Follow Us