Indore Murder Case : हनीमून मर्डर, बॉयफ्रेंड राजसोबत मिळून सोनमनं केली पतीची हत्या, बघा खूनी लव्हस्टोरी

Indore Murder Case : हनीमून मर्डर, बॉयफ्रेंड राजसोबत मिळून सोनमनं केली पतीची हत्या, बघा खूनी लव्हस्टोरी

| Updated on: Jun 11, 2025 | 12:35 PM

हत्येआधी दोघांमध्ये अनेकदा फोनवरून चर्चा देखील झाल्याची माहिती मिळते आहे. प्रियकर राज कुशवाह सोमच्या मदतीने राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमधून सोनम रघुवंशीला अटक करण्यात आलेली आहे. सोनम रघुवंशीने हनिमूनच्या दरम्यान प्रियकराला मेसेज केलेला होता आणि राजा रघुवंशी जवळीक साधत असल्याचा या मेसेजमध्ये तिने उल्लेख केला आहे. इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता सोनमच्या बॉयफ्रेंडची एंट्री झाली आहे. सोनम रघुवंशीने बॉयफ्रेंड राज कुशवाह बरोबर मिळून पतीची हत्या केली. सोनमच लग्नापूर्वी राज बरोबर प्रेम होतं.

राज कुशवाह सोनमच्या वडिलांच्या कारखान्यात काम करायचा. सोनमच्या वडिलांचा इंदूरमध्ये प्लायवुडचा छोटा कारखाना आहे. सोनम कारखान्यात यायची त्यावेळी ती राजच्या प्रेमात पडली. राज कुशवाह हा सोनमपेक्षा पाच वर्षे छोटा आहे. सोनमचा ११ मे ला राज रघुवंशी बरोबर लग्न झालं. २० मे ला हे दोघं हनीमूनसाठी मेघालयला गेले. २३ मे ला हे दाम्पत्य बेपत्ता झालं. २४ मे ला राजा रघुवंशीचा मृतदेह एका धबधब्याजवळ पोलीसांना मिळाला. सोनमने राज कुशवाह बरोबर कट रचून राजाचा खून केला. सोनमने राज बरोबर मिळून आकाश राजपूत, विशाल ठाकूर आणि आनंदला हत्येची सुपारी दिली. बघा नेमकं काय झालं?

Published on: Jun 10, 2025 07:48 PM