कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही… शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही… शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ

| Updated on: Aug 06, 2026 | 5:03 PM

शिवसेनेत फुट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत सुनावणी पार पडली

शिवसेनेत फुट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत सुनावणी पार पडली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला आहे. आजच्या युक्तिवादात सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येच्या आधारे चिन्ह दिलं असा युक्तिवाद करत हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. यावर आता सुप्रीम कोर्टाने आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल असं विधान केले आहे. युक्तीवादानंतर आजची सुनावणी संपली आहे आणि यावर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

ठाकरे गटाकडून युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तवाद केला यावर ठाकरे गटातील नेते नरेश म्हस्के आणि खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपात्रतेबद्दल विचारतातच नरेश म्हसके यांनी सांगितले की , कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काही ब्रम्हवाक्य नाही. आम्हाला कोर्टावर विश्वास आहे. पुढील सुनावणी येत्या आठवड्यात होणार आम्ही सर्व कायद्यानुसार केलं आहे, आम्हाला कोर्टावर विश्वास आहे.

Published on: Aug 06, 2026 5:03 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us