मोठी बातमी! मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील विधान भोवलं… डॉ. सेजल पवारवर मोठी कारवाई; थेट…
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कार्यक्रमामध्ये 370 ची बिर्याणी नावाने आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल झालं. या धक्कदायक प्रकरणाने एकच खळबळ उडाली. यानंतर याच कार्यक्रमातील डॉ. सेजल पवार हिच्या वक्तव्यावरून वाद उफाळला होता.
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कार्यक्रमामध्ये 370 ची बिर्याणी नावाने आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल झालं. या धक्कदायक प्रकरणाने एकच खळबळ उडाली. यानंतर याच कार्यक्रमातील डॉ. सेजल पवार हिच्या वक्तव्यावरून वाद उफाळला होता. सेजल हिने अवयवदान आणि मृतदेहासंबंधी केलेले वक्तव्य सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर समाजातील घटकांच्या भावना दुखावल्या गेल्या. यासंदर्भात १० जून रोजी ई मेलद्वारे अनेक तक्रारी रुग्णालय प्रशासनाकडे आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ प्राध्यापकांची प्राथमिक तथ्यशोधन समिती स्थापन केली.
आता या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. संबंधित प्रकरणातील डॉ. सेजल पवार हिने माफीनामा जाहिर केला होता. मात्र आता केईएम रुग्णलय प्रशासनाने मोठी कारवाई करत या महिला डॉक्टरला १५ रुग्णालयात येण्यास बंदी घातल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात अनेक जलद घडमोडी घडत असल्याचही दिसत आहे.
