Pune Rain | भिडे पूल पाण्याखाली; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणातून 27 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, त्याचा परिणाम शहरातील नदीपात्रावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

या वाढलेल्या विसर्गामुळे पुण्यातील भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी किंवा अधिक केला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील काही तास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नागरिकांनी नदीपात्र, पूल आणि पाणी साचलेल्या भागात जाणे टाळावे, तसेच प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये जनजीवनावर परिणाम झाला असून, प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.