Kishori Pednekar : सगळेच ‘संजय’ घाणेरडे… बरं झालं आमच्याकडची घाण तिकडे.. किशोरी पेडणेकरांचा घणाघात
आमदार संजय गायकवाड यांची नाराजी? पक्षाच्या संवाद बैठकीत बॅनरवरून एकनाथ शिंदेचा फोटो गायब...चिखली येथील पक्षाच्या संवाद बैठकीच्या बॅनरवर फक्त स्वतः चा आणि मुलाचा फोटो.. पेडणेकरांचा हल्लाबोल काय?
वेगवेगळ्या वक्तव्यावरून तसेच वागणुकीवरून नेहमीच चर्चेत असलेले आणि वादग्रस्त ठरलेले बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अलीकडे नाराज तर नाहीत ना..? अशी चर्चा सुरू झाल्याचे दिसतंय. संजय गायकवाड यांची पक्षाने नुकतीच जिल्हा संघटक पदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी काल चिखली शहरात पहिल्यांदाच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली. या संवाद बैठकीत स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो होता.. बॅनरवर ना पक्षाचे नाव, ना चिन्ह, ना बाळासाहेबांचा किंवा एकनाथ शिंदे यांचाही फोटो नव्हता. यासंदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य करत शिवसेनेवर आणि ठाकरे गटातील संजय नावाच्या नेत्यांवर जिव्हारी लागणारी टीका केलीये.
Published on: Aug 11, 2025 02:02 PM
