कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!

कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!

| Updated on: Nov 25, 2026 | 2:49 PM

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कोयना धरणाचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. हे पाणी सध्या समुद्रात वाया जात असून, मुंबईसह परिसराला त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांवर गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी केंद्रीय विषयांवरही भाष्य केले.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कोयना धरणाचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. हे पाणी सध्या समुद्रात वाया जात असून, ते मुंबईला आणि परिसरातील एमआयडीसी व शहरांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे या पाण्याचा उपयोग अनेक भागांसाठी होईल असे भोसले यांनी नमूद केले. या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करून लोकांमध्ये गैरसमज आणि संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.

भौगोलिक परिस्थिती समजून न घेता, विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, कोयनेचे जे पाणी वीज निर्मितीनंतर कोकणात जाऊन समुद्राला मिळते, ते पाणी मुंबईकडे आणले जात आहे. सातारा-सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याला यामध्ये कोणताही हात लावला जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी राज्याच्या आणि लोकांच्या भल्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Published on: Nov 25, 2026 2:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us