Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी छाननी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घडामोड समोर आली असून, राज्य सरकारच्या पडताळणी मोहिमेनंतर लाखो लाभार्थी महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. ई-केवायसी (e-KYC) आणि पात्रता निकषांची छाननी पूर्ण झाल्यानंतर तब्बल 92 लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद होण्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घडामोड समोर आली असून, राज्य सरकारच्या पडताळणी मोहिमेनंतर लाखो लाभार्थी महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. ई-केवायसी (e-KYC) आणि पात्रता निकषांची छाननी पूर्ण झाल्यानंतर तब्बल 92 लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद होण्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सुमारे 80 लाख लाभार्थी कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अंतिम पडताळणीनंतर हा आकडा 92 लाखांहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी ई-केवायसी, उत्पन्नाची पडताळणी आणि इतर पात्रता निकषांची तपासणी केली.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली असून, बीड जिल्ह्यात सर्वाधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, चुकीच्या पद्धतीने नावे वगळली गेल्याची तक्रार करणाऱ्या महिलांच्या अर्जांची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
छाननीदरम्यान अनेक लाभार्थींनी आवश्यक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याचे आढळून आले. तसेच, योजनेसाठी निश्चित करण्यात आलेल्या वार्षिक 2.5 लाख रुपयांच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या सुमारे 12 लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. याशिवाय, 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सुमारे 4.5 लाख महिलाही पात्र नसल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, या योजनेत गैरप्रकारांचाही खुलासा झाला आहे. सुमारे 14 हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्याचे तपासात समोर आले असून, छाननीनंतर त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
सरकारकडून लाभार्थी यादीची पडताळणी सुरू असून, पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुढील प्रक्रियाही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
