Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना…थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!

Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना…थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!

| Updated on: Jun 09, 2026 | 4:48 PM

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्यांनी एका नेत्यांवर भाष्य केले आहे. त्या नेत्याचे बोलणे मला खटकलं होतं असंही हाके यांनी म्हटलं आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके म्हणत आहेत की, त्याची आपल्यामागे फरपट होत आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्यांनी एका नेत्यांवर भाष्य केले आहे. त्या नेत्याचे बोलणे मला खटकलं होतं असंही हाके यांनी म्हटलं आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके म्हणत आहेत की, त्याची आपल्यामागे फरपट होत आहे. त्याचं कसं आहे त्यांच्याकडे आहे यंत्रणा, त्याच्याकडे आहे संघटन. मीडिया हँडल करण, माझ्या उपस्थितीत म्हणला होता की आंदोलन थांबवा, स्टेजवरच होतो ना मी पण.’

पुढे बोलताना हाके म्हणाले की, ‘बरं, हा मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय. घेऊन कोणाला गेलाय, स्वत:, स्वत:चा मुलगा, स्वत:चा पुतण्या. हे तिघेजण गेले आणि सभेत सांगत आहे की, ते तिघेजण होते आणि आम्ही तिघेजण होतो. मला लय ते वाक्य खटकलं होतं, पण जाऊदे म्हटलं. आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त.’

हाके यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीव्ही 9 मराठीने हाके यांच्याशी संपर्क साधला. यावेळी हाके म्हणाले की, कोणता व्हिडिओ आहे, कधीचा व्हिडिओ आहे, तो पूर्ण का दाखवला जात नाही? मी ओबीसींच्या प्रश्नावर भांडत आहे, लढत आहे, रांत्रदिवस पळत आहे. त्यावर कोणी बोलत नाही. अशा गोष्टींमधून काय साध्य करायचं आहे? ओबीसींच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही. या लोकांचा उद्देश लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं हा आहे. पण हाके डॅमेज होणाऱ्यातला नाही. मी बोलायचं थांबणार नाही.’ मात्र हाके यांनी डॅमेज करण्याचा प्रयत्न कोण करत आहे त्या नेत्याचे नाव मात्र घेतले नाही.

Published on: Jun 09, 2026 4:40 PM
Follow Us