जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले, प्रसाद लाड यांना थेट इशारा!

जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले, प्रसाद लाड यांना थेट इशारा!

| Updated on: Aug 07, 2026 | 10:46 AM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर जरांगे यांनी चर्चेसाठी प्रसाद लाड यांना बोलावले होते. या भेटीनंतर लाड यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेत बदल झाल्याची चर्चा सुरू असतानाच लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे.

TV9 सोबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली. “प्रसाद लाड जिथे कुठे दिसतील, पहिल्यांदा त्यांच्या कानशिलात लगावणार. मला गोळ्या घाला, जेलमध्ये टाका, पण मी त्यांना कानशिलात लगावणार,” असा इशारा हाके यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

प्रसाद लाड यांनी आपल्या मागे मोठी माणसे असल्याचे म्हटल्याचा संदर्भ देत हाके यांनी, “तुला माझ्या मागची माणसं बघायची आहेत का?” असा सवाल केला. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्ये योग्य नसल्याचे सांगत त्यांनी सरकारलाही लक्ष्य केले. “देवेंद्र फडणवीस, तुम्ही प्रसाद लाड यांना आवरा,” अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला इशारा देत, “ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल,” असे वक्तव्य केले. आरक्षणाच्या प्रश्नावर मंडल आयोगाला आव्हान देण्याच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “मंडल आयोगाला चॅलेंज केलं तर पंतप्रधानही राहणार नाहीत. चॅलेंज करून तरी बघा,” असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी केवळ प्रसाद लाड यांच्यावरच टीका केली नाही, तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

Published on: Aug 07, 2026 10:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us