Ajit Pawar | अजित पवार म्हणतात, ‘विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही’

Ajit Pawar | अजित पवार म्हणतात, ‘विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही’

| Updated on: Sep 03, 2022 | 5:15 PM

Ajit Pawar | विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले.

Ajit Pawar | विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. कोरोना काळात विद्यार्थी शाळेपासून दूरावले होते. ऑनलाईन शिक्षण पद्धती जरी राबवण्यात आली तरी तीचा मर्यादीत परिणाम होता. विद्यार्थ्यांचे (Student) दोन वर्षात प्रचंड नुकसान झाले. आता कोरोनाचे मळभ हटले आहे. शिक्षकांनी या दोन वर्षांत जे नुकसान झाले, ते भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनीही अभ्यास करावा. एवढेच नाहीतर पालकांनीही (Parents) या दोन वर्षांची कसर भरुन काढण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करावी असे आवाहन पवार यांनी केले. तसेच सगळ्यांनीच या कामी हातभार लावावा असे ते म्हणाले. महाराष्ट्रावर जे काही आरिष्ट आले, ते दूर करण्याची प्रार्थना त्यांनी गणरायाला केली. अहमदनगर जिल्हयातील एका शाळेतील कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

Published on: Sep 03, 2022 05:14 PM