मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या शिफारस पत्रात नेमकं काय?

मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या शिफारस पत्रात नेमकं काय?

| Updated on: Jun 11, 2026 | 3:07 PM

नवी दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड पाहयला मिळत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं लोकसभेतील सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. या प्रस्तावामुळे देशातील राजकीय आणि निवडणूक व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड पाहयला मिळत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं लोकसभेतील सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. या प्रस्तावामुळे देशातील राजकीय आणि निवडणूक व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसंख्या हा एकमेव निकष न ठेवता मतदानाचा टक्का, मतदारसंघाचा आकार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या, भौगोलिक विविधता तसेच ध्रुवीकरण यांसारख्या अनेक घटकांचा विचार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

अहवालानुसार, मोठ्या राज्यांमधील लोकसभा जागांमध्ये जवळपास 50 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. तामिळनाडूमध्ये जागा 39 वरून 59 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये 80 वरून थेट 120 जागा होऊ शकतात. छोट्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही जागा वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

2009 ते 2024 दरम्यानच्या लोकसभा निवडणुकांच्या आकडेवारीचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. विद्यमान 543 मतदारसंघांपैकी 170 मतदारसंघांचे विभाजन करण्याची शिफारस करण्यात आली असून त्यापैकी 59 मतदारसंघांचे दोन भाग तर 111 मतदारसंघांचे तीन भाग करण्याचा प्रस्ताव आहे.

Published on: Jun 11, 2026 3:07 PM
Follow Us