tv9 Marathi Special Report | गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवली चारकोपमध्ये पोलिस बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप

tv9 Marathi Special Report | गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवली चारकोपमध्ये पोलिस बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप

| Updated on: Mar 14, 2026 | 11:22 AM

महाराष्ट्रभर घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती, मात्र आता मुंबईकरांनाही सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.

महाराष्ट्रभर घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती, मात्र आता मुंबईकरांनाही सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात भर उन्हात नागरिकांनी सिलेंडरसाठी रांगा लावल्याचे चित्र दिसत होते. आठ ते दहा दिवसांपूर्वी बुकिंग करूनही अद्याप सिलेंडर मिळाला नसल्याची तक्रार अनेक नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, सिलेंडरच्या तुटवड्याचा परिणाम छोट्या व्यवसायांवरही दिसून येत आहे. वडापाव विक्रेत्यांनी गॅसअभावी पर्याय म्हणून चुली मांडून काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप सुरू केले आहे. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Mar 14, 2026 11:22 AM
Follow Us