OBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी मुंबईत चक्काजाम आंदोलन

| Updated on: Jul 04, 2021 | 12:05 PM

ओबीसी आरक्षणासाठी भाजपने एल्गार पुकारलेला असतानाच आता भाजपचा मित्र पक्ष असलेला रासपही ओबीसींसाठी मैदानात उतरला आहे. रासप नेते महादेव जानकर यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Follow us on

ओबीसी आरक्षणासाठी भाजपने एल्गार पुकारलेला असतानाच रासपही आता ओबीसींसाठी मैदानात उतरले आहे. रासप नेते महादेव जानकर यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे. ते सद्या मुंबईत चक्काजाम आंदोलन करत आहे.

महादेव जानकर यांनी शनिवारी मीडियाशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते ओबीसी आरक्षणासाठी रविवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करतील. ओबीसींना लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनाद्वारे या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं जानकर यांनी सांगितलं होते.