राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे

राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे

| Updated on: Feb 15, 2026 | 11:59 AM

महाराष्ट्र एटीएसने राज्यभरात मोठी कारवाई करत यवतमाळच्या पुसद, उमरखेड आणि अहिल्यानगरमध्ये २० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. तरुणांना दहशतवादी संघटनांकडे आकर्षित करण्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सिमी या बंदी घातलेल्या संघटनेच्या काही सक्रिय सदस्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभरात एक मोठी कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड येथे १४ ठिकाणी छापे टाकले आहेत. तर अहिल्यानगरमध्ये एकूण सात ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण २० हून अधिक ठिकाणी एटीएसकडून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून एटीएस संशयित व्यक्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होती. तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सक्रिय करण्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या काही व्यक्तींचा संबंध सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या बंदी घातलेल्या संघटनेशी असल्याचे समोर आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Published on: Feb 15, 2026 11:59 AM