Maharashtra Din 2026 | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Maharashtra Din 2026 | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

| Updated on: May 01, 2026 | 11:45 AM

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यभरात उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ठिकठिकाणी ध्वजारोहण आणि अभिवादन सोहळे पार पडले. मुंबईतील हुतात्मा चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत पुष्पचक्र अर्पण केले. राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना त्यांनी मानवंदना दिली तसेच नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील पालकमंत्र्यांनी आपल्या-आपल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करत महाराष्ट्र दिन साजरा केला.
बीडमध्येही महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा बीड जिल्ह्यातील पहिलाच दौरा असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
एकूणच, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यभरात अभिमान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडत आहेत.

Published on: May 01, 2026 11:45 AM
Follow Us