Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?

Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?

| Updated on: Jun 18, 2026 | 4:30 PM

शिवसेना ठाकरे गट (उबाठा) फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे बंडखोरांच्या यादीत ओमराजे निंबाळकरदेखील आहेत.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना महाराष्ट्र सरकारकडून Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबत अधिकृत पत्र जारी केले असून या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ANC-ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या 6 खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे.

सध्या ओमराजे निंबाळकर हे पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून त्यांच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेना उबाठा गटातील खासदारांच्या सुरक्षेबाबत सरकारने घेतलेल्या या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात इतर नेत्यांच्या सुरक्षेबाबतही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 18, 2026 4:29 PM
Follow Us