Ajit Pawar : NCP एकत्र व्हावी, अजित पवारांची इच्छा, पत्रकारांना थेट बोलले….पुण्यात ‘त्या’ बॅनरवर पवारांचा फोटो
अजित पवारांच्या ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या विधानाने महायुतीत शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. पुण्यातील बॅनरवर शरद पवारांच्या फोटोबाबत विचारले असता, अजित पवारांनी तुमच्या तोंडात साखर पडो असे उत्तर दिले. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या शक्यतांना बळ मिळाले आहे, तर त्यांच्या भाजपसोबतच्या भविष्यावरही चर्चा रंगल्या आहेत.
पुण्यातील एका बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी “तुमच्या तोंडात साखर पडो” असे उत्तर दिले. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्यास अजित पवार तयार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एका राजकीय नेत्याने तर अजित पवारांनी भाजपने दिलेला पक्ष सोडून मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, अशीही भूमिका मांडली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील हे मतभेद आणि राष्ट्रवादीच्या एकीकरणाची शक्यता ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीमधील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. अजित पवार यांनी त्यांच्यावरील ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून, “गुन्हा सिद्ध होण्याआधी कोणी दोषी असतो का?” असे म्हटले, तसेच “मी सत्तेत आहे” असे विधान केले. यावर भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांनी जोरदार पलटवार करत अजित पवारांनी असे बोलणे टाळायला हवे होते अशी भूमिका घेतली. रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना “आपल्या गिरेबान मे झाँक के देखीए” असा इशाराही दिला.
जिथं टेंडर, तिथं सरेंडर ही ठाकरेंची भूमिका', शिंदेंचा ठाकरेंना टोला
वसई-विरारमध्ये भाजप उमेदवारांकडून ओवाळणी फंडा, प्रचारात पैसे वाटप?
'नोटा'चं बटण तरी 66 नगरसेवक बिनविरोध का? मनसे कोर्टात जाणार!
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्याची हत्या - प्रणिती शिदें

