‘उर्फी जावेद चा नंगानाच महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही’, चित्रा वाघ यांचा कोणाला इशारा?

‘उर्फी जावेद चा नंगानाच महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही’, चित्रा वाघ यांचा कोणाला इशारा?

| Updated on: Jan 05, 2023 | 6:28 PM

उर्फीवर हल्ला चढवला तसेच महाराष्ट्रात उर्फीचा नंगा नाच चालू देणार नाही. यासाठी मी बोलले, तिला माझा विरोध नाही तिच्या विकृतीला आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या

मुंबई : राज्यातील वातावरण सध्या चांगलेच तापलेलं दिसत आहे. आधी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यामुळे त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे. यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे. त्यात आता भर पडलेली आहे ती भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेदच यांच्या वादाची. सोशल मीडिया सेन्शनल आणि फॅशन क्वीन अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यावरून सुरू झालेला वाद आज पत्रकार परिषदेत आला आणि चित्रा वाघ यांनी थेट इशाराच दिला.

तर पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी उर्फीवर हल्ला चढवला तसेच महाराष्ट्रात उर्फीचा नंगा नाच चालू देणार नाही. यासाठी मी बोलले, तिला माझा विरोध नाही तिच्या विकृतीला आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या.

त्याचबरोबर वेब सिरिजवरुण तेजस्वीनी पंडित यांना नोटिस पाठवणाऱ्या राज्य महिला आयोगाला चित्रा वाघ यांनी घेरलं. तसेच उर्फी जावेदवर काय करणार असा सवालही वाघ यांनी केला. तर उर्फीच्या नंगानाचला त्यांचे समर्थन आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले आहे

Published on: Jan 05, 2023 06:28 PM