तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्…एका चुकीमुळे भांडाफोड; बीडच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणात खळबळजनक खुलासा!
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात एका कॅफेमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळाले आहे. सुरुवातीला ही घटना छळ आणि गैरवर्तन असल्याची समोर आले होते, मात्र तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाले आहेत.
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात एका कॅफेमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळाले आहे. सुरुवातीला ही घटना छळ आणि गैरवर्तन असल्याची समोर आले होते, मात्र तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाले आहेत. आरोपीच्या मोबाईलमध्ये संबंधित मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ सापडल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. मोबाईलमधील सामग्री मिळाल्यानंतर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (आयटी ॲक्ट) अतिरिक्त कलमे लावली आहेत. त्यामुळे तपास अधिक सखोल पद्धतीने सुरू झाला आहे. आरोपी आणि पीडितेची ओळख एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. आरोपीने मुलीला कॅफेत बोलवलं अन् तिच्यावर अतिप्रसंग आणला होता.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधित सर्व बाबींची बारकाईने चौकशी केली जात आहे.
