कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा सरकारला मोठा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. तसेच कुणबी प्रमाणपत्रांचे काही प्रमाणात वाटपही झाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा सरकारला मोठा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. तसेच कुणबी प्रमाणपत्रांचे काही प्रमाणात वाटपही झाले. यानंतर आता नवा वाद समोर आला आहे. काही प्रमाणपत्र धारकांच्या तक्रारीनुसार कुणबी प्रमाणपत्रे अवैध ठरवली जात आहेत.
या प्रकरणी पुन्हा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे अवैध प्रमाणपत्र ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक घेणार आहेत. आधीच त्यांनी याबाबत सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी अलीकडेच माध्यमांशी संवाद साधला होता तेव्हा शासनाला स्पष्ट इशारा दिला होता. ते म्हणाले की, प्रमाणपत्रे रद्द होत आहेत ती सरकारची जबाबदारी आहे आणि हे एका प्रकारे मराठा समाजाचे नुकसान आहे आणि मराठ्यांच्या लेकराबाळांचे नुकसान आहे. हे नुकसान आम्ही सहन करून घेणार नाही. या प्रकरणी आता शासनाची अजून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.
