Maratha Reservation Rally : मोठी बातमी, जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, जरांगे पाटलांच्या मुंबईतील उपोषणापूर्वी घडलं काय?

Maratha Reservation Rally : मोठी बातमी, जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, जरांगे पाटलांच्या मुंबईतील उपोषणापूर्वी घडलं काय?

Harshada Shinkar | Updated on: Aug 28, 2025 | 1:46 PM

मराठा आंदोलक सतीश देशमुख असं हृदयविकाराचा झटका आलेल्या मृत व्यक्तीचं नाव असून मुंबईतील मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वीच ही मोठी दुर्घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जुन्नरमध्ये एका मराठा आंदोलकाला हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या आंदोलकाचं नाव सतीश देशमुख असं आहे. हा मराठा आंदोलक बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वडगावमधील असल्याची माहिती सध्या मिळतेय.

मुंबईतील मोर्चासाठी काल मनोज जरांगे पाटील आणि काही आंदोलक अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. आज सकाळी मनोज जरांगे पाटील आता शिवनेरी किल्यावरवर दाखल झाले. महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुन्नरमध्ये असताना मराठा आंदोलकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. येत्या 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार होते. मात्र त्यांच्या आंदोलनाची परवानगी मुंबई हायकोर्ट आणि मुंबई पोलिसांकडून नाकारण्यात आली होती. यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांना अटी शर्तींसह आंदोलनाची एक दिवसाची परवानगी जरांगेंना देण्यात आली आहे.

Published on: Aug 28, 2025 1:34 PM
Follow Us