आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत

| Updated on: Sep 04, 2026 | 3:14 PM

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथून मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत दाखल झाले आहेत. हे अनोखे आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. आंदोलकांनी सांगितले की, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांवर अन्याय झाल्यावर मावळे घोड्यावर बसून […]

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथून मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत दाखल झाले आहेत. हे अनोखे आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

आंदोलकांनी सांगितले की, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांवर अन्याय झाल्यावर मावळे घोड्यावर बसून जायचे, त्याच परंपरेचे स्मरण करत आम्ही हे आंदोलन करत आहोत. गेल्या ४० वर्षांपासून मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले असून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.

Published on: Sep 04, 2026 3:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us