मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, आम्ही आता…

मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, आम्ही आता…

| Updated on: Apr 27, 2026 | 2:45 PM

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील नेत्यांमध्ये वाद सुरू होते. आज या संदर्भात परिवहन विभागाची बैठक झाली. मंत्रालयातील परिवहन विभागाची बैठक संपली असून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील नेत्यांमध्ये वाद सुरू होते. आज या संदर्भात परिवहन विभागाची बैठक झाली. मंत्रालयातील परिवहन विभागाची बैठक संपली असून याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार आहे. रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींनी मुदत वाढ मागितली आहे. मात्र, याबाबत उद्या निर्णय घेऊ, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्या सरकार मुदत वाढ देणार की नाही? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मुंबईतील ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय लागू होणार होता. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, 1 मेपासून ही सक्ती नसेल. या निर्णयामुळे रिक्षाचालकांमध्ये असलेली भीती आणि अस्वस्थता काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत उद्याच निर्णय होणार असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मराठी सक्तीच्या मुदतवाढीबाबत आम्ही उद्या निर्णय घेऊ. पण मराठी शिकमारच नाही, हा आडमुठेपणा चालणार नाही. मराठी शिकावीच लागेल, असं सरनाईक यांनी सुनावले आहे.

बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  ते म्हणाले ‘हा निर्णय पुढे ढकलण्यासाठी अनेकांनी वेगवेगळी मुदत मागितली होती. कोणी एका वर्षाची कोणी सहा महिन्याची तर दुसऱ्या कोणी तीन महिन्याची, ही मुदत नेमकी कधी पर्यंत मिळेल हे ठरवू’

Published on: Apr 27, 2026 2:43 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us