New Delhi | आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत

New Delhi | आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत

| Updated on: Jun 03, 2026 | 2:00 PM

दिल्लीतील उच्चभ्रू मालवीय नगर परिसरात एका हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीच्या खिडक्या आणि बाल्कनींकडे धाव घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दिल्लीतील उच्चभ्रू मालवीय नगर परिसरात एका हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीच्या खिडक्या आणि बाल्कनींकडे धाव घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, आग अत्यंत वेगाने पसरल्यामुळे काही मिनिटांतच संपूर्ण इमारत धुराने वेढली गेली. परिस्थिती गंभीर होताच अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी थेट बाल्कनीतून खाली उड्या मारल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही लोक अजूनही इमारतीत अडकले असल्याची शक्यता असून घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर राजधानीतील हॉटेल्स आणि व्यावसायिक इमारतींमधील अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आग इतक्या वेगाने कशी पसरली आणि सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याचा तपास प्रशासनाकडून केला जात आहे.

Published on: Jun 03, 2026 2:00 PM
Follow Us