छगन भुजबळ हतबल? मनोज जरांगे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच स्वतःच म्हणाले, बिल्कुल…

छगन भुजबळ हतबल? मनोज जरांगे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच स्वतःच म्हणाले, बिल्कुल…

Harshada Shinkar | Updated on: Dec 22, 2023 | 2:41 PM

जरांगेनी सरकारला वेठीस धरले आहे, असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, जरांगेनी सरकारला वेठीस धरलेले नाही तर सरकारनेच जरांगेना वेठीस धरले आहे. तसेच मी याआधी केलेली माझी सर्व भाषणे मागे घेतो. तर पुढच्या मेळाव्यात जरांगे पाटील यांच्या बाजूने भाषणे करणार...

मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. अशातच काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टीका करत त्यांच्यावर टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी हतबल झाल्याचे म्हटले. उपरोधिक बोलणं ही हतबलता आहे. किंवा जरांगे पाटील यांना घाबरलो म्हणा…काहीही म्हणा काही हरकत नाही असे भुजबळांनी म्हटले. तर जरांगेनी सरकारला वेठीस धरले आहे, असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, जरांगेनी सरकारला वेठीस धरलेले नाही तर सरकारनेच जरांगेना वेठीस धरले आहे. तसेच मी याआधी केलेली माझी सर्व भाषणे मागे घेतो. तर पुढच्या मेळाव्यात जरांगे पाटील यांच्या बाजूने भाषणे करणार असल्याचे म्हणत भुजबळांनी उपरोधिक टोलाही लगावला.

Published on: Dec 22, 2023 2:41 PM
Follow Us