Mira Bhayndar Mahapalika: मीरा भाईंदरच्या महापौरपदी मेहता, मराठीप्रेमींचं आंदोलन
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड झाल्यानंतर मराठी एकीकरण समितीनं तीव्र आंदोलन छेडलं आहे. समितीने डिंपल मेहतांच्या निवडीला विरोध करत केवळ मराठी व्यक्तीच महापौर असावा अशी मागणी केली आहे. या निवडीवरून शहरात मराठी आणि अमराठी असा वाद उभा राहिला आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड झाल्यानंतर शहरात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू झाला आहे. मराठी एकीकरण समितीनं डिंपल मेहतांच्या निवडीला तीव्र विरोध करत आंदोलन छेडले असून, महापौरपदी मराठी व्यक्तीच असावी अशी मागणी केली आहे. समितीने निवड होण्यापूर्वीही डिंपल मेहतांच्या नावाला विरोध केला होता.
यावर डिंपल मेहता यांनी स्वतःला महाराष्ट्राची मुलगी संबोधत, त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे आणि त्यांचे पालकही महाराष्ट्रातील असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांच्याकडे ओबीसी महिला असल्याचं प्रमाणपत्र असून, त्या अमराठी कशा असू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला. तर आंदोलनकर्त्यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मराठी समाजाच्या विरोधात अमराठी लोकांना भडकावल्याचा आणि घराणेशाहीचा आरोप केला आहे. मीरा-भाईंदर महापालिका मुंबई एमएमआरचाच एक भाग आहे. यापूर्वीही नरेंद्र मेहता आणि गीता जैन महापौरपदी होते.
