पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन

पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन

| Updated on: Aug 23, 2026 | 10:10 PM

पुणे रेल्वे स्थानकावर एका अनपेक्षित घटनेने खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आले आहे. काही तरुणांना तिकीट तपासनिसाने (टीसी) पकडले असता, त्यांनी थेट निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तरुणांनी आपली अडचण मांडताच, ओमराजे निंबाळकर यांनी त्वरित मदतीचा हात पुढे केला. निंबाळकर यांनी टीसीसोबत संवाद साधत, तरुणांचा दंड भरण्याची तयारी दर्शवली. “ही चार पोरं आहेत, त्यांचं […]

पुणे रेल्वे स्थानकावर एका अनपेक्षित घटनेने खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आले आहे. काही तरुणांना तिकीट तपासनिसाने (टीसी) पकडले असता, त्यांनी थेट निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

तरुणांनी आपली अडचण मांडताच, ओमराजे निंबाळकर यांनी त्वरित मदतीचा हात पुढे केला. निंबाळकर यांनी टीसीसोबत संवाद साधत, तरुणांचा दंड भरण्याची तयारी दर्शवली. “ही चार पोरं आहेत, त्यांचं चुकलं असेल तर मी भरतो. २० तारखेला मी पुण्यात येणार आहे, तेव्हा त्यांचे पैसे भरतो,” असे निंबाळकर यांनी टीसीला सांगितले. त्यांनी टीसीचा फोन पे नंबर मागून पैसे पाठवण्याचे आश्वासन दिले. या संवादात, टीसीने निंबाळकर यांना अधिकारी संबोधले असता, त्यांनी नम्रपणे “मी खासदार आहे” असे स्पष्ट केले.

Published on: Aug 23, 2026 10:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us