बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?

बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 13, 2026 | 10:44 AM

मुंबईतील २४ वर्षीय तरुणीचा छत्तीसगडमधील बस्तर सफरीदरम्यान दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे. रिद्धी ठक्कर ही तरुणी आपल्या महिला बायकर्सच्या ग्रुपसोबत बस्तरच्या सफरीवर गेली होती. जगतरा दरीतील एका वळणावर तिच्या बाईकला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण अपघातात रिद्धी ठक्कर हिचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

रिद्धीसोबत तब्बल २३ महिला बायकर्सचा ग्रुप बस्तर सफरीसाठी आला होता. रिद्धीला बाईक रायडिंगचा अनेक वर्षांचा अनुभव होता. अनुभवी बायकर असूनही बस्तर सफरीदरम्यान झालेल्या या अपघातात तिचा दुर्दैवी अंत झाला.

या घटनेमुळे रिद्धीच्या कुटुंबीयांसह तिच्या सहकारी बायकर्समध्येही शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कसा घडला, अज्ञात ट्रक चालक कोण आहे आणि त्याच्यावर पुढे काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Published on: Aug 13, 2026 10:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us