Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल…
मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी आहे. शहराच्या प्रदूषणात पुन्हा वाढ झाली असून, एक्यूआय (AQI) 146 वर पोहोचला आहे. देवनार सर्वात प्रदूषित ठिकाण ठरले असून, बोरीवलीची हवा सर्वोत्तम आहे. दिवाळीतील फटाक्यांमुळे वाढलेले प्रदूषण मध्यंतरी कमी झाले होते, परंतु आता त्यात पुन्हा वाढ झाली आहे.
मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. दिवाळीनंतर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत घट झाली असून, प्रदूषण पुन्हा वाढले आहे. शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) आता 146 वर पोहोचला आहे. या अहवालानुसार, मुंबईतील देवनार परिसर सध्या सर्वात प्रदूषित ठिकाण म्हणून नोंदवला गेला आहे, तर बोरीवलीची हवा सर्वात चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून आले आहे.
ऐन दिवाळीमध्ये फटाक्यांच्या अतिवापरामुळे मुंबईच्या प्रदूषणामध्ये लक्षणीय वाढ झाली होती. त्यावेळी एक्यूआय 170 ते 175 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर मध्यंतरी दोन दिवस प्रदूषणात घट नोंदवली गेली होती, ज्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून फटाके वाजवण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हवेतील प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे.
काल मुंबईचा एक्यूआय 137 नोंदवला गेला होता, तर आज तो 146 पर्यंत वाढला आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या अतिवापरामुळे केवळ प्रदूषणच नाही, तर आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर यांनी टीव्ही ९ मराठीसाठी मुंबईतून याबाबत वृत्त दिले आहे.
