मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

| Updated on: Sep 29, 2026 | 12:52 PM

मुंबईच्या आझाद मैदानात उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाचे तीव्र आंदोलन सुरू आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शासकीय नोकरीतील अन्यायाविरोधात न्याय मिळावा यासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी बॅरिकेटिंग लावूनही आंदोलकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सीएसएमटी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आंदोलन शांत न होण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. मातंग समाजासह इतर समुदायांनी शासकीय नोकऱ्या आणि अन्य क्षेत्रांमध्ये झालेल्या अन्यायावर न्याय मिळावा या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संयमाने आणि शांततेने मोर्चे काढूनही उपवर्गीकरणाची मागणी प्रलंबित असल्याने आंदोलकांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठी गर्दी झाली आहे.

आंदोलकांनी सीएसएमटी ते मंत्रालय हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही आंदोलक बॅरिकेटिंग झुगारून रस्त्यावर आले. या वेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली, काही महिला आंदोलकही महिला पोलिसांशी बाचाबाची करताना दिसल्या. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आमदार सुनील कांबळे यांनी सरकारला या मागणीकडे लक्ष देण्याची आणि तातडीने न्याय देण्याची विनंती केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन शांत बसणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

Published on: Sep 29, 2026 12:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us