मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी

मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी

| Updated on: Jun 08, 2026 | 2:13 PM

मुंबईतील दादर परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दादर येथील प्लाझा टॉकीजजवळ झालेल्या या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने हा अपघात घडला. नियंत्रणाबाहेर गेलेल्या बसने रस्त्यावरील वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर रस्त्यावरून जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला चिरडले. या भीषण धडकेत दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. चालकाचे नियंत्रण कसे सुटले आणि अपघातामागील इतर कारणांचा तपास सध्या सुरू आहे.  tv9marathi, tv9marathinews

Published on: Jun 08, 2026 2:13 PM
Follow Us