भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23…

भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23…

| Updated on: Jun 13, 2026 | 1:08 PM

मुंबईतील बेकायदेशीर वारसा, अधिवास, उत्पन्न तसेच जन्मदाखल्यांच्या मोठ्या गैरप्रकाराचा धक्कादायक भंडाफोड झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

मुंबईतील बेकायदेशीर वारसा, अधिवास, उत्पन्न तसेच जन्मदाखल्यांच्या मोठ्या गैरप्रकाराचा धक्कादायक भंडाफोड झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि महसूल अधिकारी नागनाथ लोलेवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांच्या डिजिटल सहीचा गैरवापर करून आपले सरकार पोर्टल आणि सेतू कार्यालयामार्फत महिनाभरात हजारो प्रमाणपत्रे दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महसूल विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. संशयित प्रमाणपत्रांची तपासणी सुरू असून अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत.

एफ साऊथ आणि एफ नॉर्थ विभागातील 1 हजार 023 प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. चार पथकांनी सुमारे 50 टक्के दाखल्यांची पडताळणी केली असता 221 प्रमाणपत्रांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे स्पष्ट झाले. एमआरए मार्ग पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Published on: Jun 13, 2026 1:08 PM
Follow Us