Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक

Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक

| Updated on: Sep 26, 2026 | 7:39 AM

मुंबईतील लालबागचा राजा आणि गिरगावचा राजा यांच्या भव्य विसर्जन मिरवणुकांचे मनोहारी दृश्य अनुभवण्यासाठी गणेशभक्तांची प्रचंड गर्दी उसळली. गिरगाव चौपाटीवर विविध मंडळांच्या मूर्ती दाखल झाल्या असून, उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला जात आहे. भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.

मुंबईत 2026 च्या गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लालबागचा राजा आणि गिरगावचा राजा यांच्या विसर्जन मिरवणुक अजूनही सुरु आहेत. लालबागचा राजाचे विसर्जन यंदा अधिक उशिराने होत आहे, हजारो भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आले आहेत. १९३४ मध्ये स्थापन झालेल्या लालबागचा राजा मंडळाची ओळख ‘नवसाला पावणारा राजा’ अशी असून, देशभरातून गणेशभक्त दर्शनासाठी येतात. दुसरीकडे, गिरगावचा राजा देखील आपल्या विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.

Published on: Sep 26, 2026 7:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us