Russian Oil Supply | गुड न्यूज… टेन्शनच मिटलं, सौदी अरेबियातून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज

Russian Oil Supply | गुड न्यूज… टेन्शनच मिटलं, सौदी अरेबियातून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज

| Updated on: Mar 12, 2026 | 2:35 PM

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने भरलेलं जहाज मुंबईत पोहचलं आहे. लायबीरियाच्या झेंडेखाली येणारे हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतात दाखल झाले आहे. काही दिवसांच्या प्रवासानंतर हे जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले आहे.

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने भरलेलं जहाज मुंबईत पोहचलं आहे. लायबीरियाच्या झेंडेखाली येणारे हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतात दाखल झाले आहे. काही दिवसांच्या प्रवासानंतर हे जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले आहे. जहाजाने इराणच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी प्रवासादरम्यान काही काळ सिग्नल सिस्टम बंद ठेवली होती. भारताच्या जवळपास पोहोचल्यावर ते जहाज परत ट्रॅक केले गेले. या जहाजामध्ये एकूण 1,35,335 टन कच्चं तेल लोडेड आहे. ही घटना तेल पुरवठा आणि जागतिक व्यापारातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जात आहे.

Published on: Mar 12, 2026 02:30 PM
Follow Us