Sanjay Nirupam | तुम्ही तर टुकार माणूस आहात… मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली; कुणी कुणाला सुनावले?

Sanjay Nirupam | तुम्ही तर टुकार माणूस आहात… मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली; कुणी कुणाला सुनावले?

| Updated on: Apr 24, 2026 | 12:42 PM

येत्या 1 मे पासून मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे, पण त्यावरून राजकीय वर्तुळात वाद सुरू झाले आहेत. महायुतीतील खडाजंगी दरम्यान आता शिंदेसेनेतील धुसफूसही समोर आली आहे. मराठीच्या सक्तीवरून शिंदे गटातील दोन नेतेच आमनेसामने आले आहेत.

शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी अनिवार्य केल्यानंतर शिवसेनेच्याच संजय निरुपम यांनी या सक्तीला तीव्र विरोध दर्शवला आहे. “प्रत्येक रिक्षा चालक शिक्षित असेल असे नाही, त्यांनी मराठीचा आदर करावा याची सक्ती तुम्ही करू शकता, मात्र सक्ती करणे योग्य नाही. सक्ती करत असाल, तर मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्यांना आधी भाषा शिकवा”, अशा शब्दात संजय निरुपम यांनी आपल्याच मंत्र्याला सुनावले आहे. संजय निरुपम यांनी आपल्याच नेत्याला घरचा आहेर दिल्यानंतर या वादात मनसेने उडी घेत निरुपम यांना चांगलेच सुनावले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निरुपम यांना टुकार माणूस म्हणत हल्लाबोल चढवला आहे.

तुम्ही ‘टुकार माणूस आहात, एवढे करूनही तुम्हाला मत मिळत नाहीत,’ असा हल्लाच संदीप देशपांडे यांनी चढवला आहे. त्यावर संजय निरुपम यांनी “आम्ही हे सगळे मतदानासाठी करत नाही. तुम्ही पण करता, तुमचे किती आमदार, खासदार येतात? तुम्ही मराठी भाषेचा आग्रह मतांसाठी करता का?” असं सडेतोड उत्तर निरुपम यांनी देशपांडे यांना दिलं आहे.

Published on: Apr 24, 2026 12:42 PM
Follow Us